• मुख्यपृष्ठ
  • तपशील
  • अर्ज
  • सूचना
  • बक्षिसे
  • मुख्यपृष्ठ
  • तपशील
  • अर्ज
  • सूचना
  • बक्षिसे
  • इकोफ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२०

    इकोफ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२०

    सर्व गणेश भक्तांना नमस्कार,
    सन २०२० साठीच्या इकोफ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा तपशील जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

    स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना कॅनव्हार्ट कार्यसंघाकडून शुभेच्छा.

    नोंदणी करा आरती संग्रह
  • इकोफ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२०

    स्पर्धेचा तपशील

    स्पर्धा २२ ऑगस्ट २०२० (शनिवार) पासून सुरू होईल. छायाचित्रे, व्हिडिओ पाठवणे आणि सबमिट करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२० (गुरुवार) आहे.

    २९ ऑगस्ट २०२० (शनिवार) रोजी निकाल घोषित केला जाईल.

    निकाल पुढील संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

    www.canwhart.com

    नोंदणी करा आरती संग्रह
  • इकोफ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२०

    स्पर्धेसाठी अर्ज कसा करावा ?

    २०२० च्या गणपती सजावटीच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी खाली नमूद केलेल्या कोणत्याही पद्धतींचा वापर करुन तुम्ही स्पर्धेत भाग घेऊ शकता.

    - आम्हाला आपले पूर्ण नाव, ईमेल, मोबाईल नंबर, घराचा पत्ता, छायाचित्रे आणि व्हिडिओ info@canwhart.com वर ईमेल करा.

    किंवा

    - आपले पूर्ण नाव, ईमेल, मोबाईल नंबर, घराचा पत्ता, छायाचित्रे आणि व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअँप नंबरवर (+९१ ९६६ ५००८५४७) पाठवा.

    आपण नोंदणी केल्यानंतर आपणास आपल्या प्रवेशाची पोचपावती दिली जाईल.

    टीप - सद्यपरिस्थिती पाहता आम्हाला प्रत्येक सहभागी घरास भेट देणे शक्य नाही. आम्ही आपल्या विश्वासावर आधारित ही स्पर्धा आयोजित करत आहोत. कृपया बनावट किंवा जुने फोटो किंवा आपले इतर फोटो पाठवू नयेत हि नम्र विनंती.

    नोंदणी करा आरती संग्रह
  • इकोफ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२०

    स्पर्धेसाठी फोटो किंवा व्हिडिओ कसा पाठवाल ?

    सहभागी होण्यासाठी आणि छायाचित्रे, व्हिडिओ सादर करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२० (गुरुवार) आहे.

    - संपूर्ण सजावट दृश्यमान आहे याची खात्री करुन ३ ते ५ छायाचित्रे काढावीत.

    - आपण आम्हाला सर्व छायाचित्रे info@canwhart.com किंवा आमच्या व्हॉट्सअँप नंबरवर (+९१ ९६६ ५००८५४७) पाठवू शकता.

    - आम्हाला किमान ३० सेकंद किंवा अधिक व्हिडिओ आवश्यक आहेत जे आपली संपूर्ण सजावट दर्शवितात. आपण आपल्या कॅमेर्‍याद्वारे किंवा मोबाईल कॅमेर्‍याद्वारे व्हिडिओ घेऊ शकता.

    - आपण आम्हाला व्हिडिओ info@canwhart.com किंवा आमच्या व्हॉट्सअँप नंबरवर (+९१ ९६६ ५००८५४७) पाठवू शकता.

    - जर आपण आपल्या मोबाईलवर व्हिडिओ घेणार असाल तर व्हिडिओ काढताना कृपया मोबाइल Horizontal (आडवा) पकडा . मोबाइल Vertical (उभा ) ठेवून व्हिडिओ काढू नये.

    खाली नमूद केल्याप्रमाणे माहिती देखील आवश्यक आहे :

    स्पर्धकाचे नाव :

    स्पर्धकाचा पत्ता :

    मोबाईल नंबर :

    ईमेल :

    सजावट थीम नाव :

    सजावट वर्णन :

    सजावटीसाठी वापरले साहित्य :

    नोंदणी करा आरती संग्रह
  • इकोफ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२०

    बक्षीस श्रेणी

    विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले जाईल.

    आम्ही बहुविध निकषांच्या आधारे बक्षीस विजेत्यांचा निर्णय घेतील आणि आमचा निर्णय अंतिम मानला जाईल.

    नोंदणी करा आरती संग्रह

कॉपीराइट © २०२० कॅनव्हार्ट | कॅनव्हार्ट डिजिटल